building गोवा शिक्षण विकास महामंडळ अधिनियम 2003 अन्वये जीईडीसीची स्थापना खालीलसाठी करण्यात आली आहे.

(i) गोव्यातील जनतेच्या वैयक्तिक, संस्थात्मक व सामाजिक-सांस्कृतिक विकासाच्या गरजा भागविण्यासाठी स्पर्धात्मक, लवचिक व मूल्याधारित शिक्षण व्यवस्था विकसित करण्यासाठी गोवा राज्यातील शैक्षणिक संस्था, सेवा व सुविधांची जलद व सुव्यवस्थित स्थापना, वाढ व विकासाला प्रोत्साहन देणे व मदत करणे.

(ii)विशेषतः, आणि खंडाच्या सार्वत्रिकतेला पूर्वग्रह न बाळगता (i) राज्य सरकारने निवडलेल्या ठिकाणी शैक्षणिक वसाहती स्थापन करणे व त्यांचे व्यवस्थापन करणे. त्यासाठी राज्य सरकारने निवडलेल्या शैक्षणिक क्षेत्रांचा विकास करुन शैक्षणिक संस्थांना स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी उपलब्ध करुन देणे. आर्थिक आणि सामाजिक शिक्षणावर आधारित पदवीधर तयार करण्याच्या योजनांना प्रोत्साहन देणे. शैक्षणिक चाचणी सेवा विकसित करणे आणि उमेदवारांच्या निवडीसाठी शैक्षणिक संस्थांना उपलब्ध करुन देणे. ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आणि वाइड एरिया नेटवर्क सारख्या माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित सुविधा विकसित करणे आणि त्या शैक्षणिक संस्थांसाठी उपलब्ध करुन देणे. ई-लर्निंग सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानासह शिक्षण आणि प्रशिक्षण साहित्य विकसित करणे. साक्षरता वाढविण्यासाठी सर्व स्तरांवर विशेषतः माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित योजनांना प्रोत्साहन देणे. कर्ज आणि शिष्यवृत्ती, ग्रंथालये आणि पुस्तक बँक, पुस्तकाचे प्रकाशन, शैक्षणिक प्रक्रियेत पालकांचा सहभाग, त्यांना व्यवसायात मदत करणे, उच्च आणि/किंवा तांत्रिक शिक्षण यासारख्या विद्यार्थ्यांना लाभ होणार्‍या योजनांची अंमलबजावणी करणे. संशोधन सुविधांच्या विकासाला प्रोत्साहन देणे. शैक्षणिक क्षेत्रात परिषद, कार्यशाळा, चर्चासत्र, इत्यादी आयोजित करणे. ज्या उद्दिष्टांसाठी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे आणि त्याच्याशी निगडीत सर्व बाबींच्या पूर्ततेसाठी इतर कॉपर्रेट संस्था किंवा संस्थांबरोबर किंवा सरकारबरोबर संयुक्तपणे किंवा एजन्सी तत्त्वावर योजना किंवा कामे हाती घेणे.

गोवा शिक्षण विकास महामंडळ अधिनियम 2003

गोवा शिक्षण विकास महामंडळाचे संचालक मंडळ

अनु.क्र.

सदस्याचे नाव

पदनाम

1.

श्री. गोविंद पर्वतकर

अध्यक्ष

2.

सचिव (उच्च शिक्षण), गोवा सरकार

संचालक

3.

संचालक (उच्च शिक्षण), गोवा सरकार

संचालक

4.

श्री. नरसिंह भटगांवकर

संचालक

5.

श्री. बाबाजी सावंत

संचालक

6.

व्यवस्थापकीय संचालक, जीईडीसी

पदसिद्ध सचिव

 

माहिती हक्क

अनु.क्र.

अधिकार्‍यांचे नाव

पदनाम

1.

श्री.सागर गावडे व्यवस्थापकीय संचालक

प्रथम अपील अधिकारी

2.

श्री. ब्रिजेश शिरोडकर

जन माहिती अधिकारी / जन तक्रार अधिकारी / जनसंपर्क अधिकारी

3.

श्री. अमर पाटील

सहाय्यक जन माहिती अधिकारी

 

गोवा शिक्षण विकास महामंडळ अधिकारी

अनु.क्र.

अधिकार्‍यांचे नाव

पदनाम

1.

श्री. गोविंद पर्वतकर

अध्यक्ष

2.

श्री. सागर गावडे

व्यवस्थापकीय संचालक

3.

श्री. ब्रिजेश शिरोडकर

महाव्यवस्थापक

4.

श्रीमती श्रद्धा कामत बांबोळकर

प्रकल्प व्यवस्थापक

5.

श्री. शिवराज कापडी

अधिकारी (लेखा आणि प्रशासन)

6.

श्रीमती ऍनेट रिवा पो

सहाय्यक व्यवस्थापक (प्रशिक्षण आणि विकास)